संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर व्यापक उपक्रम राबविण्या साठी दयावान प्रतिष्ठानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..

तेरणा काठ वृत्तसेवा — भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असलेल्या ऐतिहासिक पर्वाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दयावान प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदना मार्फत भारतीय संविधान हे जगातील सर्वात लोकशाहीप्रधान आणि समतेवर आधारित संविधान असून त्यातूनच भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांची हमी मिळते. संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असताना हा “संविधान अमृत महोत्सव” केवळ औपचारिक न राहता तो लोकचळवळ म्हणून साजरा केला गेला पाहिजे या भूमिकेतून
आपल्या निवेदनात त्यांनी
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सामूहिकरित्या संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात यावे.
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संविधान विषयक व्याख्याने, चर्चासत्रे, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.
प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर संविधान जनजागृती रॅली काढण्यात यावी.
ग्रामीण व शहरी भागात संविधान मूल्यांवर आधारित कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात यावीत.
युवकांमध्ये संविधानप्रेम निर्माण करण्यासाठी विशेष शैक्षणिक आणि सामाजिक अभियान राबविण्यात यावे यासारखी उपक्रम राज्यभर राबवण्यात यावे याकरिता विनंती केली आहे.
“संविधान” ही केवळ एक ग्रंथरचना नसून भारतीय लोकशाहीची आत्मा आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संविधानाची मूल्ये पोहोचली पाहिजेत. अमृत महोत्सव हा केवळ सरकारी स्तरावर न राहता जनतेचा उत्सव झाला पाहिजे.” या उद्देशाने दयावान प्रतिष्ठानच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांकडे राज्यभर “संविधान अमृत महोत्सव” अधिकृत स्वरूपात साजरा करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व घेतलेला निर्णय आम्हाला लवकरात लवकर कळवावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी, सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद, अक्षय सातव, विशाल फल्ले, शफिक शेख, मुन्ना तांबोळी, बबलू शेख, आकाश पवार, मोसिन मुल्ला, अलीम दारूवाले, आकाश किरवे उपस्थित होते.



