आयएएस अधिकाऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यात ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन

तेरणा काठ वृत्तसेवा — राष्ट्रीय ग्राम स्वयंरोजगार(RGSY) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन गावच्या सरपंच सुषमा धनंजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थीं यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणार्थींनी सर्वप्रथम गावचा कृती आराखडा तयार करून त्यावर सखोल असे प्रात्यक्षिक तयार केले ज्यामध्ये वेगवेगळी पिके दवाखाना शाळा मंदिरे पोस्ट ऑफिस किराणा दुकान रस्ते ओढे नाले बंधारे इत्यादी विविध गोष्टींचे प्रात्यक्षिक घेऊन त्या संदर्भात सखोल माहिती समजून घेतली त्यानंतर संपूर्ण गावची शिवार फेरी करून लहानात लहान ते मोठ्यात मोठी गोष्ट या सर्वांचा सखोल अभ्यास केला
राष्ट्रीय ग्राम स्वयंरोजगार(RGSY) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन गावच्या सरपंच सुषमा धनंजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीस पंचवीस लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीस निधी मंजूर करून आणण्यासाठी विस्तार अधिकारी दत्तात्रय साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी दिपक वेदपाठक, ग्रामपंचायत सदस्य अर्जून देशमुख,भागवत तौर, जगन्नाथ माळी व गावातील आजी -माजी पदाधिकारी शाम देशमुख, प्रभाकर लंगडे,रमेश देशमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



