ताज्या घडामोडी
प्रहार दिव्यांग शाखा येरमाळा यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा

तेरणा काठ वृत्तसेवा ––ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा येथे प्रहार दिव्यांग शाखा येरमाळा यांच्या वतीने. 3 डिंसे. जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .यावेळी अध्यक्ष मारुती वाघमारे उपाध्यक्ष किरण बारकुल सरपंच विशाल बारकुल तानाजी सवने वसंत जाधवर राजेश बारसकर रविशंकर बारसकर सचिन बारकुल दत्ता मनगिरे महेश बारकुल नागनाथ बारकुल जहांगीर पठाण सुधाकर बारकुल उपस्थित होते . तसेच येरमाळा व बांगरवाडी मधील जे दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थी आहेत, ज्यांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत आणि ज्यांचे आधार अपडेट नाही अशा सर्व लाभार्थी यांनी दिनांक 4 व 5 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात कॅम्प साठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.



