चंपाषष्ठी पासून दहिफळ येथे श्री खंडोबा यात्रा

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान जागृत असुन चंपाषष्ठी दिवशी मोठी यात्रा भरते.यंदा यात्रेनिमीत्त यात्रा कमिटीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.पाच दिवस देवाचा छबीना मिरवण्यात येतो.नागदिव्यादिवशी मोठा छबीना असतो.यावेळी शोभेची दारू उडविण्यात येणार आहे.यात्रेच्या दिवशी दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासुन मानाचे नैवद्य दाखविण्यात येणार आहे तसेच दुपारी लंगर तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे.लगेच देवाचा गाडाबगाड मिरवण्यात येईल. रात्री ८वाजता सांस्कृतीक कार्यक्रम एका पेक्षा एक अप्सरा ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तसेच दुसऱ्या दिवशी २७ तारखेला भव्य सोंगाचा कार्मक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता लोकनाट्य तमाशा रुपाली पुणेकर यांचा कार्यक्रम होणार आहे. दि.२८ नोव्हेंबर रोजी २ ते ६ वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री गर्जा हा महाराष्ट्र लोकगीत,समाज प्रबोधन,देवाच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
राजे ग्रुप यंदा ३लाखाचा महाप्रसाद करणार असुन
गेल्या १५वर्षापासुन राजे ग्रुप महाप्रसादाचे आयोजन करते.
यात्रेच्या दिवशी सकाळी खंडोबा देवाला नैवद्य दाखवून महाप्रसाद वाटपाला सुरूवात होते. जवळपास ८०सदस्य ग्रुपमध्ये असुन अध्यक्ष नाही.सर्व वर्गणी गोळा करून महाप्रसाद करतात. सकाळी आठ वाजल्यापासुन ते सायंकाळी ६वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार असल्याचे वैजिनाथ मते यांनी सांगितले आहे.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष अभिनंदन मते,उपाध्यक्ष चरणेश्वर पाटील,कोषाध्यक्ष समाधान मते,सदस्य शिवशंकर भातलवंडे,मधूकर भुसारी,महादेव भातलवंडे,तानाजी ढवळे,सुधीर मते,गंगाधर ढवळे,सज्जन कोठावळे,महादेव कांबळे,प्रदिप भातलवंडे,सुरेश भातलवंडे,चंद्रकांत मते,सुदर्शन ढवळे,रामेश्वर भातलवंडे,सुधीर भातलवंडे,बालाजी ढवळे,योगराज पांचाळ,पांडुरंग मते.
यात्रा कमिटी यात्रा पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
यंदा गावातील ५३ लोकांनी एकत्र येऊन लेझीम पथक तयार केले आहे.यंदाचे मुख्य आकर्षण लेझीम पथक असणार आहे.



