शाक्यसिंह प्रतिष्ठान येरमाळा यांचा अभिनव उपक्रम

तेरणा काठ वृत्तसेवा — महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या संकल्पनेवर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करून वाढत्या जातीवादी वातावरणाला आळा घालण्यासाठी शाक्यसिंह प्रतिष्ठानच्या वतीने येरमाळा येथील कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिका छायांकित फ्रेम भेट देण्यात आली.
येरमाळा गावात शाक्यसिंह प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून यांच्या चालू असलेल्या सामाजिक उपक्रमाने संस्था नेहमीच चर्चेत असते. एक सक्षम पर्याय म्हणून कुठल्याही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण न होता सामाजिक बंधुत्व टिकवण्यासाठी ते काम करत आहे, संविधान दिनानिमित्त ही शाक्यसिंह प्रतिष्ठानच्या वतीने मोहेकर विद्यालय येरमाळा, येरमाळा पोलीस ठाणे, येरमाळा ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, परिवहन महामंडळ बस स्टँड ऑफिस या सर्व कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिका छायांकित फ्रेम भेट देऊन आणखी एक अनोखा सामाजिक उपक्रम पूर्ण केला
महापुरुषांच्या विचाराचे ग्रंथ विनामूल्य वाटून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम संस्था करत असल्याचे संस्थापक अध्यक्ष :-निशांत कांबळे यांनी सांगितले.त्याप्रसंगी सिद्धार्थ कांबळे, गौरव कांबळे, संस्कार गवळी, सागर बोकेफोडे, रवी कसबे, आदित्य धावारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते



