नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांची कार्यतत्परता काही मिनिटांत दिले उत्पन्न प्रमाणपत्र

तेरणा काठ वृत्तसेवा — धाराशिव तालुक्यातील रुईभर व गौडगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले उत्पन्न प्रमाणपत्र तातडीने मिळावे म्हणून समाजीक कार्यकर्ते आकाश चव्हाण यांनी धाराशिव येथील नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची आवश्यकता समजताच नायब तहसीलदार यांनी कोणताही विलंब न लावता केवळ काही मिनिटांत उत्पन्न प्रमाणपत्र मंजूर करून देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.
कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेच्या कामात तत्पर अधिकारी म्हणून बलकवडे यांची ओळख अधोरेखित झाली आहे. त्यांच्या त्वरित निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडथळे दूर झाले आहे या कामात सहकार्य केलेल्या तहसीलदार जाधव मॅडम तसेच संपूर्ण तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही कामास विलंब न लावता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने दाखवलेली ही तत्परता प्रशंसनीय असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.



