ताज्या घडामोडी

कर्मयोगी, आदर्शवादी व्यक्तीमत्व जायफळचे माजी सरपंच सूर्यकांत पापा पाटील…!

तेरणा काठ वृत्तसेवा —जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले॥१॥तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा ॥

जे दुःखी कष्टी, प्रपंचीक त्रासाने गांजले आहेत, त्यांना जो आपले म्हणतो. तोच खरा साधू म्हणून ओळखावा आणि त्याच्या ठिकाणी देव आहे असे समजावे.

अशी शिकवण जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला दिली. महाराष्ट्र ही संतांची व शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते. या मातीतल्या माणसांच्या जडणघडणीत संतानी मोठी कामगिरी बजावली आहे. तर या मातीतल्या माणसांना स्वाभिमानासह कष्टाने, हिमतीने, धाडसाने जगण्यासाठीचा आदर्श महापुरुषांच्या बलीदानातून मिळाला आहे. या महापुरुषांच्या शूर वीरतेचा व संतांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कार्य करणारे अनेक जननायक आजच्या काळात आहेत.

कुठल्याही गावच्या हितासाठी आणि उत्कर्षासाठी गावातील जानकार व दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या नायकांचे कार्य हे महत्वपूर्ण ठरते. अशा नायकांच्या कामामुळे गाववर येणारे संकटेही टळतात. अशा जननायकांचा गावातील गोरगरीब लोकांना कायम आधार वाटतो. त्यामुळे गावात शांतता निर्माण होऊन ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात स्थैर्य प्राप्त होण्यासाठी मदत होते. गावाच्या भविष्यासाठी सकारात्मक विचार करून, कायम कार्यरत असणारे कळंब तालुक्यातील मौजे जायफळ येथील माजी सरपंच सूर्यकांत (पापा) एकनाथ पाटील या जननायकांच्या कार्याचा आढावा वाचकांसमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न ‘तेरणा एक्सप्रेसने’ केला आहे.

जायफळ हे गाव धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. गाव तसे खूपच चांगले. आठरा पगड जातींचे लोक गुण्या गोविंदाने गावात नांदतात. आध्यात्मिक क्षेत्रातही गाव अग्रेसर आहे. देशाच्या सिमेवर रक्षण केलेले सैनिकही गावात आहेत. गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावातील बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायासह शेतीकामात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून येथील माता भगिनी मदत करतात. म्हणून गावातील प्रत्येक कुटुंब सुखी आणि समृद्ध आहे. येथील तरूण पिढी तर खूप जिद्दी आणि कष्टाळू आहे. व्यसनापासून आजूनही गाव कोसो दूर आहे. गावातील तरुण भरकटत असतील तर त्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी माजी सरपंच सूर्यकांत पापा पाटील सतत प्रयत्नशील असतात.

अशा या सुंदर व देखण्या गावाला योग्य वाटेने, भविष्यातील आदर्शवादी गाव म्हणून राज्याच्या पटलावर घेऊन जाण्यासाठी माजी सरपंच सूर्यकांत पापा पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. गावगाड्याच्या कारोभारात अडचणीच गाठूडच असतं. एक अडचण सुटली की, दुसरी अडचण निर्माण झालेली असते. त्यामुळे गावगाड्यात काम करणे खूप अवघड मानले जाते. तरीही गावच्या हितासाठी प्रामाणिकपणे गावच्या अडचणीचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेऊन काम करणारे सूर्यकांत पाटील यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे माणसं आजही जायफळ नगरीमध्ये आहेत. ही बाब जायफळकरांसाठी भाग्याची म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

माजी सरपंच सूर्यकांत पापा पाटील यांनी तब्बल पाच वर्ष गावचे सरपंच म्हणून यशस्वी काम केले. सरपंच म्हणून काम करत असताना त्यांच्यावर अनेक वेळा संकटेही आले. पण त्या संकटांवर मात करून सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी अखंड सेवेचे व्रत निस्वार्थी भावनेने आजही सुरूच ठेवले आहे. जायफळ गावात आठरा पगड जातींचे लोक राहतात. त्यांच्या विविध प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी सूर्यकांत पाटील यांनी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांनी केलेल्या शेकडो कार्यापैकी एका कार्याचा दाखला देत आहोत. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी गावातील लोकांना जुन्या पुराव्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूर्यकांत पापा पाटील यांनी तब्बल दहा वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा करून जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी जुने पुरावे उपलब्ध करून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. पापा पाटील यांनी केलेल्या परिश्रमामुळे गावातील शेकडो ओबीसी, एस्सी, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा शैक्षणिक क्षेत्रात मोठा लाभ मिळत आहे. तर घरकुलसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी, एस्सी, एनटी प्रवर्गातील घटकांतील लोकांना याचा उपयोग होत आहे. तसेच गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, म्हणून विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आता पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनामुळे काही तरुण पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पोलीस, तलाठी, उत्कृष्ट समाजसेवक, व्यवसायीक , उत्कृष्ट लोकप्रतिनिधी निर्माण झाले आहेत. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे वृत्त पार पाडतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांनी अनेक अडचणीतील कुटुंबाना मदतीच हात दिल्याने गावातील शेकडो कुटुंबांतील लोकांच्या चेहर-यावर आजही आनंद दिसून येत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.