ताज्या घडामोडी
दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व संस्थांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

तेरणा काठ वृत्तसेवा — दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी कलम ५१ व ५२ अन्वये संघटना व संस्थांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संबंधित संघटना व संस्थांनी आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिव्यांग कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.नोंदणीचा प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या कार्यालयात सादर करावा.



