ज्ञानेश्वरी अजित उर्फ राज निकम यांनी केला शिवसेना उ.बा.ठा. पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल
तेरणा काठ वृत्तसेवा — धाराशिव नगरपालिका अर्ज भरण्यास इच्छुकांची सुरुवात झाली आहे.प्रभाग क्रमांक 19 मधून ज्ञानेश्वरी अजित उर्फ राज निकम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ज्ञानेश्वरी राज निकम या धाराशिव शहरातील गणेश नगर परिसरातून असून गणेश नगरची रणरागिनी अशी त्यांची ओळख आहे. समाजकार्य, महिलांशी संबंधित प्रश्नांवर लक्ष आणि परिसरातील विविध प्रश्नांवर त्या वेळोवेळी आवाज उठवतात.
*जनसेवा हाच धर्म
नागरिकांचा कुठलाही प्रश्न असो तो सोडवण्यासाठी त्या तत्पर असतात दिवस असो वा रात्र कोणाचाही फोन आला तरी काही मिनिटात घटनास्थळी हजर होऊन त्या तो प्रश्न मार्गी लावतात.
ज्ञानेश्वरी ताई यांचा संपर्क सर्वच जाती-धर्मातील लोकांमध्ये दांडगा असून त्यांनी त्यांच्या सामाजिक कामातून गणेश नगर व धाराशिव मध्ये त्यांची एक ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनसंपर्काचा विचार करता विरोधकांसाठी ही निवडणूक कठीण ठरण्याची चिन्हे आहेत सामाजिक राजकीय आणि धार्मिक पातळीवर त्यांचा मजबूत पाया असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगला प्रतिसाद उमटत आहे. धाराशिव शहरात राजकारणात अनेक चेहरे असले तरी काम करणारा चेहरा म्हणून ज्ञानेश्वरी ताईकडे पाहिले जाते.
सक्षम, हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे येणाऱ्या कालखंडात गणेश नगरचा विकास करून त्या चेहरा बदलणार अशी गणेश नगर येथील रहिवासी यांची भावना नाही.
म्हणून येणाऱ्या कालखंडात ज्ञानेश्वरी ताई राज निकम यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक 19 ला एक नवीन नगरसेवक लाभणार असं वाटतं आहे.



