ताज्या घडामोडी

प्रा.सोमनाथ लांडगे यांना राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार प्रदान:

तेरणा काठ वृत्तसेवा — शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. सोमनाथ लांडगे यांना सांगलीच्या ईगल फाउंडेशन तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय गरुडझेप पुरस्कार – २०२५” भटक्या विमुक्तासाठी देशपातळीवर कार्य करत असलेले मा. पद्मश्री दादा इधाते व मा. मंत्री मा. डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस ईगल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराचा सन्मान समारंभ दि. ९ नोव्हेंबर २०२५ (रविवार) रोजी अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, अष्टा (जि. सांगली) येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. पद्मश्री दादा इधाते,. अण्णासाहेब डांगे, सदाभाऊ खोत,. डॉ. शंकर अदानी, प्रविण काकडे,. अरूण घोडके, सूर्यकांत तोडकर
आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. सोमनाथ लांडगे हे श्री साई श्रद्धा एज्युकेशन संस्थेचे संचालक असून, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे १६ जिल्ह्यांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नीट परीक्षेची ऑनलाइन पध्दतीत टेस्ट सिरीज घेण्यात असून, या अत्यंत अल्प फीस घेऊन करण्यात येत असलेल्या ऑनलाइन टेस्ट सिरीज चा फायदा अनेक गरजू व गरीब कुटुंबातील विद्यार्थीना होत आहे.
तसेच, धाराशिव येथे अल्प शुल्कात मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
त्याचबरोबर श्री साई श्रद्धा सेवाभावी संस्थेमार्फत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षण शुल्कासाठी सातत्याने मदत केली जाते.

सध्या प्रा. सोमनाथ लांडगे हे बिल गेट्स ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी आणि पालक वर्गात समाधान, विश्वास आणि अभिमानाची भावना आहे.
आपल्या मनोगतात पद्मश्री दादा इधाते, मा. डॉ. अण्णासाहेब डांगे व प्रविण काकडे यांनी प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख करून पुढील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास शुभेच्छा दिल्या.

प्रा. सोमनाथ लांडगे यांना विविध क्षेत्रांतून मिळालेल्या सन्मानांनंतर धाराशिव परिसरासह संपूर्ण राज्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
कॉपी करू नका.