येरमाळा पत्रकार संघाच्या उपक्रमामुळे तरुणाईला भुरळ

तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उच्चपदस्थ प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या.भूमीपुत्रांचा नागरी सत्कार व विविध स्पर्धेच्या आयोजनामुळे तरुणाईला काहीतरी नवं करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून 6 जानेवारी रोजी तरुणाईला प्रेरणा मिळावी व गावातील सामाजिक सलोखा कायम चांगला रहावा यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले.यामध्ये प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या युवकांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा म्हणून विविध स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे आयोजन करून वैद्यमापन शास्त्र निरीक्षक रत्नदीप बारकुल,राज्यकर निरीक्षक अधिकारी वैभव कवडे,पुरवठा निरीक्षक जयदेवी कांबळे या भुमि पुत्राच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी महिला ज्येष्ठ पत्रकार शीला उंबरे,माजी सभापती विकास बारकुल,सरपंच सौ.प्रिया बारकुल,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधाकर बिराजदार,सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव येडाई व्यसनमुक्तीच्या डॉ.पल्लवी तांबारे, विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक सचिन पाटील प्राचार्य सुनील पाटील, जनहित परिवाराचे अध्यक्ष सतोष तौर यांची प्रमुख उपस्थिती होती.येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार अभ्यासिका इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील काही दिवसांनी विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध होणार असल्याने उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने शिलाताई उंबरे यांना सन्मानित करण्यात आले.समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल,सूत्रसंचलन प्रा.महादेव गपाट यांनी तर आभार सचिन बारकुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार सचिन बारकुल दत्ता बारकुल दीपक बारकुल सुधीर लोमटे सुखदेव गायके तानाजी बारकुल बालाजी रमेश बारकुल संतोष बारकुल मिलिंद देशमुख कल्लेश भोसले यांनी परिश्रम घेतले.



