दहीफळ गावातील महिलांची वज्रमूठ गावात दारूबंदी झाली पाहिजे.

तेरणा काठ वृत्तसेवा –— कळंब तालुक्यातील दहिफळ हे गाव साडेचार हजार लोकसंख्या असणारे गाव आहे.गाव तसे सांस्कृतीक,वैचारिक,धार्मिक,सामाजिक,कलागुणांनी नटलेले गाव आहे.ग्रामदैवत खंडोबा देवस्थान जागृत देवस्थान आहे.खंडोबा यात्रा हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गणेश उत्सव,शारदीय नवरात्र उत्सव,बैलपोळा,उरूस,सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात.सामाजिक सलोखा इथे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती,राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांची जयंती,छत्रपती संभाजी महाराज जयंती,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व जात बांधव यांच्या उपस्थीत मोठ्या उत्सहात जयंती साजरी केली जाते.
गावाची विशेष ओळख म्हणजे नाट्यकलाकारांचे गाव म्हणुन ओळखले जाते.प्रत्येक घरात एक तरी कलाकार आढळतो.गावात आठवडी बाजार भरतो,गावात शाळेची दोन मजली भव्य इमारत आहे.प्राथमिक शाळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.पशुवैद्यकीय दवाखाना आहे.
पंतसंस्था,कपड्यांची दुकाणे,मोटार सायकलचे शोरुम आहे,गॅरेज आहेत,दुध डेअरी,पाव बेकरी,सोने चांदीचे दुकाणे आहेत चहा पानटपरी हाॅटेल आहेत.पुणे मुंबई लातुर,बार्शी,धाराशिव कळंब,ढोकी ला जायला बस सेवा सुरु आहे.एकंदरीत गाव सुधारीत आहे.परिसरातील गावाच्या तुलनेत बाजारपेट असणारे गाव म्हणजेच दहिफळ गाव होय.
परंतु आलिकडच्या काळात वेगळी ओळख होऊ लागलेलं
शैक्षणिक दृष्ट्या थोडं मागास पडत असलेलं गाव ,व्यसनाधिनतेकडे जात असलेलं गाव,यात्रेत (बाया)नृत्यांगणा नाचवणारे गाव,लहान शाळेत जाणारी मुलं दारूच्या अहारी जात असणारे गाव अशी शरमेने मान खाली जात असणारे गाव वेगळी ओळख होऊ लागले आहे.कुठतरी आपण चुकीच्या दिशेने जातोय,भावी पिढी वाम मार्गाला जात आहे.एक पालक म्हणुन आई वडील म्हणुन थोडा विचार करणे गरजेचे आहे.
अचानक गावात दारूबंदीचा मुद्दा पेटला.आई,बहिण,आज्जी,बायको,भावजयी,शेजारीन,
अश्या कित्येक रुपातील महिला एक एल्गार घेऊन घराच्या बाहेर पडल्या.गावात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे.नवरा,सासरा,पोरगा,नातू दारू पिऊन घरात येताना दिसतात.वयाने लहान असणारी पोरं दारू प्यायली.दारू पिणारे तरूण वयात मरू लागली कैक स्त्रीया तरुणपणीच विधवा झाल्या,कुणाचे वडील,कुणाचा भाऊ,कुणाचा मित्र मरण पावले.अनेकांचे संसार उघड्यावर आलेत.
दारुमुळे घरगुती हिंसाचार वाढले,आर्थीक समस्या निर्माण होऊ लागल्यात,भांडणतंटे वाढले,कर्जबाजारी होऊ लागले.असे का? कश्यामुळे होऊ लागले तर दारू विक्री करणाऱ्या दुकाणांची संख्या वाढली.गावात दारू मिळत असल्यामुळे शाळकरी मुलेही पिऊ लागली.पुढची पिढी सुरक्षीत नाही.बायका मुली सुरक्षीत नाहीत.मग याला एकच मार्ग गावात दारूबंदी करायला पाहिजे.बऱ्याच महिलांनी एकत्र येऊन आळा घालण्यासाठी वज्रमुठ बांधली.थेट ग्रामपंचायतवर मोर्चा काढला व गावात दारूबंदी करा.नवीन दुकानांना परवाणगी देऊ नका.आमचे कुटुंब,संसार मुले वाचवा साद घातली.
ग्रामसेवक सरपंचाकडे निवेदन दिले.
शेकडो महिला एकत्र आल्या होत्या.परंतु दारूबंदी करणे कठीण आहे.कारण या आधी गावात दारुबंदीचा प्रयोग केला होता.तो असफल झाला होता.यावेळी पण तसेच होईल असा अनेकांचा समज होता.
विशेष ग्रामसभा घ्यायची होती.पण काही कारणामुळे बैठक झाली जवळपास ३५० महिला जमा झाल्या होत्या.महिलांचा प्रतिसाद बघुन यावेळची लढाई अतितिव्र स्वरुपाची होणार असल्याची चाऊल देऊन गेली.
बैठकीमध्ये अनेक माता भगीणींनी व्यथा मांडल्या आपल्या व्यथा सांगत रडू कोसळले.ऐकणाऱ्या माणसांचे डोळे पाणावले.
ज्याचे जळते त्यालाच कळते.वेदना सांगुन कळत नाहीत त्या अनुभवाव्या लागतात.
आज प्रत्येक गावात युवा तरूण पिढी व्यसनाच्या विळख्यात आडकत चालली आहे.व्यसन एक प्रकारचे नाही.बिडी,सिगारेट,हुक्का,आफु,गांजा,चरस,दारु ,बिअर ताडी,सिंदी,असे बरेच प्रकार आढळतात.आपल्याकडे २१ वर्षांखालील तरुणांना दारु पिण्यास बंदी आहे. तसा कायदा आहे. परंतु आज तरुण वर्ग सर्रासपणे बारमध्ये दारु पिताना दिसतात. सिगारेटच्या पाकिटावरही वैधानिक इशारा छापलेला असतो. परंतु त्याकडे सिगारेटचे झुरके मारणारी मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
एक व्यवासाय म्हणुन आपण काहीतरी चालू करतो.पण तोच व्यवसाय स्वत:साठी समाजासाठी,गावासाठी घातक ठरत असेल तर तो करावा का नाही .यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे.कधी नव्हे तो दहिफळ गावात महिलांचे मोठ्याप्रमाणात संघटन झाले आहे. त्यांच्या भावना समजुन घ्याव्या लागतील.भावी पिढींचा विचार करावा.
जिजाऊ,सावित्रीच्या लेकी जाग्या झाल्या क्रांतीची मशाल पेठवून रस्त्यावर उतरल्यात.जिल्हाधिकारी कार्यालय,पोलिस अधिक्षक कार्यालय,राज्य उत्पादक शुल्क कार्यालय ,तहसिल कार्यालय,पोलिस स्टेशन पर्यंत तळमळीने गावातील दारूबंदी व्हावी म्हणुन निवेदने दिली आहेत.
–



