राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आश्वासन–जिल्हा परिषद सांजा गटाची जागा आर. पी.आय (सचिन खरात गट)साठी सोडणार

तेरणा काठ वृत्तसेवा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी आज दि 04/01/2026 रो.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)धाराशिव जिल्हाध्यक्ष.प्रतापसिंहजी पाटील यांची भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि आर. पी.आय (सचिन खरात)मधील समन्वय राखण्यावर विशेष भर देण्यात आला.
राजाभाऊ राऊत हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, मागील अनेक वर्षांपासून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अत्याचारग्रस्त, पीडित व वंचित समाजघटकांसाठी आंदोलन, मोर्चे, निषेध निवेदने, उपोषणे आणि शासन दरबारी न्याय मिळवण्याचे काम केले आहे. तसेच, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक समावेशाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे, ज्यामुळे ते धाराशिवमधील सामाजिक न्यायाच्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचे नेते मानले जातात.
भेटीत प्रतापसिंहजी पाटील यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, जिल्हा परिषद सांजा गटाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)साठी सोडण्यात येईल. यावर राजाभाऊ राऊत यांनी समाधान व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने व निष्ठेने काम करण्याची हमी दिली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, धाराशिवमधील ही भेट आणि घोषणादेखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय (खरात)मधील आगामी निवडणुकांसाठी ऐक्य, समन्वय आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या दृढतेसाठी महत्त्वाची ठरेल.
आर.पी.आय (खरात)ची आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कायम राहील.
यावेळी भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (श.प)धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंहजी पाटील
आर.पी.आय (सचिन खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,अरुणकुमार माने,राष्ट्रवादी काँग्रेस (अ.सं.)विभागाचे राज्य सचिव शरीफ शेख उपस्थित होते.



