विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये महाराष्ट्राच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी येरमाळा पोलीस ठाण्याचे एपीआय तातेराव भालेराव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील रेखाजळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात महिलांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. शाळेमध्ये तक्रारपेटी बसविण्यात आली असून प्रत्येक वर्गात तसेच संपूर्ण शालेय कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पॉक्सो कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींच्या अडचणी व समस्या तात्काळ सोडविण्यासाठी शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती व सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा निर्माण झाली.



