ग्रामसभेत दारूबंदी ठराव झाला असला तरी मतदान पध्दतीने होणार दारुबंदी

तेरणा काठ वृत्तसेवा — आम्ही बार बंद करतो परंतु गावात चोरून कुणी दारु विक्री करु नये. तसेच गुटखा,तंबाखु,सिगारेट,गांजा यावर बंदी घाला.कुठलाच अवैध धंदा चालु देणार नाही असा ग्रामपंचयातने ठराव मांडावा अशी मागणी बारमालकांनी दारुबंदी बाबत विशेष ग्रामसभेत केली.
दहिफळ मधील महिलांनी दारुबंदी व्हावी यासाठी.जिल्हाधिकारी कार्यालय ,जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय,उत्पादन शुल्क कार्यालय,तहसिल कार्यालय,पोलिस स्टेशनकडे निवेदन दिले होते. यामुळे महिलांची विशेष ग्रामसभा दि.१जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली.ग्रामसभेच्या अध्यक्षा मंदाकिनी भातलवंडे यांची निवड करण्यात आली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मनिषा सुकाळे,विस्तार अधिकारी साकुंके ,ग्रामसेवक मडके,सरपंच चरणेश्वर पाटील,उपसरपंच अभिनंदन मते,तंटामुक्ती अध्यक्ष तात्या भातलवंडे, सदस्या उज्वला भातलवंडे,पुनम गोरे,अनिषा काकडे,कमल धोंगडे,विद्या मते, उपस्थित होत्या.
गावात दारुबंदी कायमस्वरुपी करण्यात यावी असा उपस्थीत महिलांच्या वतीने सुवर्णा भातलवंडे यांनी दारुबंदीचा ठराव मांडला.दारुबंदी ठरावाला अनुमोदन संध्या मते व अरुणा कुठे यांनी दिल्यानंतर. ग्रामसेवक यांनी मतदान पध्दतीने कायमस्वरुपी दारूबंदी होणार असल्याचे जाहीर केले. यावर बिअर बार मालकांनी आमचा पाठिंबा आहे.आम्ही बार बंद करतो परंतु गावात चोरून कुणी दारु विकी नये. तसेच गुटखा,तंबाखु,सिगारेट,गांजा यावर बंदी घाला.कुठलाच अवैध धंदा चालु देणार नाही असा ग्रामपंचयातने ठराव मांडावा.आम्ही स्वत:हून बार बंद करतो अशी बार मालकाने भुमिका ग्रामसभेत मांडली परंतु तसा ठराव मंजूर करण्यात आला नाही ग्रामसभेसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



