रस्ता सुरक्षा अभियान 2026 ची हेल्मेट रॅलीद्वारे उत्साही सुरुवात

तेरणा काठ वृत्तसेवा — रस्ता सुरक्षा अभियान २०२६ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव व जिल्हा पोलीस प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ जानेवारी २०२६ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आज १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी वाहनास रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे बॅनर लावून त्यास हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ची सुरुवात केली.
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी .प्रशांतराव साळी, नवनाथ साठे,.राजन शिंदे,.शुभम खोसे तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक .अरविंद हिंगोले व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यालयीन अधीक्षक धनंजय लोंढे, नरसिंह कुलकर्णी व इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी,शिपाई तसेच कार्यालयात आलेले सर्व नागरिक,वाहन चालक/मालक,मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व वाहन वितरकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात हेल्मेट परिधान करून बाईक रॅलीद्वारे करण्यात आली.ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथून शहरातील तेरणानगर,ज्ञानेश्वर मंदिर, भानूनगर,सेंट्रल बिल्डिंग,एस.पी. ऑफिस,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, तुळजाभवानी स्टेडियम,कोर्ट इत्यादी ठिकाणी फिरवून पुन्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव येथे येऊन समारोप करण्यात आला.
तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी .हर्षल डाके यांनी कार्यालयात जमलेल्या वाहन मालक/चालक व इतर नागरिकांना मार्गदर्शन करताना दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करणे,चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे, अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ अँम्बुलन्स बोलावून रुग्णालयात पोहोचविण्यास मदत करणे तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये,असे आवाहन केले.



