एम एस बी अर्बन पतसंस्था येरमाळा दिनदर्शिका २०२६ प्रकाशन सोहळा संपन्न
तेरणा काठ वृत्तसेवा –एम एस बी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, येरमाळा यांच्या वतीने सलग सातव्या वर्षी प्रकाशित होत असलेल्या एम एस बी अर्बन पतसंस्था येरमाळा दिनदर्शिका २०२६ चा भव्य प्रकाशन सोहळा पोलीस निरीक्षक संग्राम भालेराव, भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर महेंद्र भोर, हभप दत्तात्रेय बोधले महाराज, ज्ञानद्योग विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील, येडेश्वरी देवस्थान मानकरी अमोल पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष लहू बारकुल, यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवात मैत्रीपूर्ण विश्वासाची या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने गेल्या सात वर्षांपासून सभासद, ठेवीदार व सर्वसामान्य नागरिकांशी जोपासलेला विश्वास या दिनदर्शिकेच्या माध्यमातून अधिक दृढ होत असून दिनदर्शिकेत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक टिपणी माहिती समाविष्ट करण्यात आली असून ती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला यावेळी विशाल पंडित, किरण बारकुल, उमाकांत जाधवर, बालाजी पौळ, सुरज बारकुल, आनंद महाराज, संदीप बारकुल, अजित बेदरे, बाळासाहेब ठोंबरे, सुभाष बारकुल, रमेश ठोंबरे, विशाल वारकुल, सुखदेव गायके, लालासाहेब बारकुल, सोहेल इनामदार, प्रवीण मोरे, उमेश भालेकर, नरखेडकर, व्यवस्थापक रमाकांत सावंत, संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी वृंद, सभासद, ठेवीदार येरमाळा व परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी शंकरराव बारकुल यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



