दहिफळमध्ये दारूबंदीसाठी महिला एकवटल्या

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुक्यातील दहिफळ येथील महिलांनी दारूबंदीसाठी एकत्र येत ग्रामपंचायतवर मोर्चा काढून निवेदन सादर केले.निवेदनामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की.गावात सात बीअर बार आहेत.दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.तरुन पिढी व्यसनात बरबाद होत आहेत.सात बिअर बार असताना नवीन बिअर बारला ग्रामपंचायतने परवाना दिला आहे.गावात लेडीज बार होणार असल्याची चर्चा आहे.तसेच लोककला सांस्कृतीक केंद्र होणार असल्याची चर्चा आहे.कुठल्याच नवीन बार ,किंवा कलाकेंद्राला परवाना देऊ नये .अंजली ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ७५ महिलांचा मोर्चा ग्रामपंचायतवर धडकला.एकाच वेळी दोन अर्ज दाखल झाले.एकही अर्ज नवीन बिअर बारला ,कलाकेंद्राला परवाना देऊ नये असा होता तर उपस्थीत महिलांनी गावात दारू बंदी करा म्हणुन दुसरा अर्ज दाखल केला.लवकरच महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन दारू बंदीचा ठराव घेण्याचे अश्वासन ग्रामसेवक सरपंच यांनी दिले.महिलांची गावातील ७० टक्के उपस्थीती असली तरच दारुबंदी करता येईल असे सांगितले.
यावेळीग्रामसेवक मडके, सरपंच चरणेश्वर पाटील,उपसरपंच अभिनंदन मते,सदस्य नामदेव खंडागळे,सदस्य प्रदिप भातलवंडे,वसंत धोंगडे,प्रशांत भातलवंडे समाधान मते व महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होते.



