कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलच्या’ शार्व पाटील याची ‘होमी भाभा’ परिक्षेच्या द्वितीय फेरीसाठी निवड

तेरणा काठ वृत्तसेवा — नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘होमी भाभा’ या परीक्षेमध्ये ‘कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, कळंब येथील शाळेचा इयत्ता ६ वीचा विद्यार्थी *शार्व पाटील* याची द्वितीय फेरीसाठी निवड झाली असून या परीक्षेमध्ये शाळेमधून इयत्ता ९ वी व ६ वी चे एकूण २० विद्यार्थी बसले होते .
त्यामध्ये सहावीमधून
१)अन्यया ताटीपामुल
२) काव्या जाधवर
३) कृष्णाली बावळे
४)शुभश्री रीतापुरे
५) सौम्या नारकर
६) विहानराजे दिवाने
७)ओम जाधवर
तर ९ वी मधून
८) समृद्धी सलगर
९)अनिशा नांदे
१०) शंभूराज निकम
११)प्रांजल देशमुख
१२) युगंधरा देशमुख
हे सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र होऊन यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले .याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री.रवि नरहिरे, उपाध्यक्षा सौ. आशा नरहिरे, सचिव श्री. प्रणव नरहिरे, मुख्याध्यापक श्री.पवन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचेअभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .



