संत गाडगे बाबा त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब बसस्थानकाची स्वच्छता.

तेरणा काठ वृत्तसेवा — 20 डिसेंबर राष्ट्रसंत गाडगेबाबा कीर्तनासाठी अथवा भेट देण्यासाठी जात असत त्या ठिकाणी ते किर्तन आधी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता करत त्याचबरोबर अंधश्रद्धा, व्यसन, कर्जबाजारीपणा या विषयावर समाज प्रबोधन करीत असत गाडगे बाबांनी स्वच्छतेचे महत्व कीर्तन ,प्रवचन यातून सांगत असताना प्रत्यक्ष हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्यांच्या पावन स्मृतीस प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम हाती घेऊन अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी कळंब बस स्थानक व बस आगार परिसरात स्वच्छता केली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, माजी नगराध्यक्ष बबनराव वाघमारे, वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष बळीराम कवडे महाराज, ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मंनगिरे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, शिवाजी गीड्डे, राजेंद बिक्कड , प्राचार्य महादेव गपाट, बाळासाहेब यादव, रमेश शिंदे,पोपट साळवे, गुलाब बागवान सामाजिक कार्यकर्ते माधव सिंग राजपूत, बंडू ताटे सचिन क्षिरसागर यांनी संत गाडगेबाबा भूमिकेत हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला .



