आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा — आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया संस्थेने वतीने जलस्त्रोतांच्या कामास कळंब तालुक्यातील गावात प्रारंभ करत धाराशिव येथे एक दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले.
कळंब तालुक्यातील 10 गावामध्ये.पाणी लवचिकता वृद्धी व शाश्वत जलव्यवस्थापन उपक्रम सुरू करण्यात आला आहे आहे
या उपक्रमाचा उद्देश गावातील जलस्रोतांचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व संवर्धन यासाठी समुदायामध्ये जागरूकता निर्माण करणे, ज्ञानवृद्धी करणे आणि कौशल्य विकसित करणे हा आहे. यामध्ये महिला बचत गट आणि युवा मंडळांना पाणी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देण्यात आला असून त्यासाठी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास जलसंधारण विभागाच्या डेप्युटी इंजिनियर श्रीमती भाग्यश्री डोन , जलदूत ऑफ मराठवाडा हनुमंत केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी हनुमंत केंद्रे यांनी पाणी व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी सुंदर लोमटे यांनी पाण्याचं नियोजन कसं करायचं यावर उहापोह केला.या प्रकल्प प्रारंभ कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील 10 गावामधील सरपंच/महिला भगिनी/युवक/शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक सचिन मर्ती यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिक कदम ( प्रकल्प व्यवस्थापक धाराशिव ) व आकाश घुले प्रकल्प समन्वयक धाराशिव यांचे मार्गदर्शक लाभले शेवटी कार्यक्रमाचे आभार योगेश मुंडे यांनी मानले



