जिल्हा परिषद येरमाळा गटासाठी सौ. ज्योती जगताप यांची दावेदारी मजबूत
तेरणा काठ वृत्तसेवा — जिल्हा परिषद निवडणुकीत.येरमाळा गटातून उमेदवारांची चर्चा सुरू असताना, चोराखळी येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. ज्योती तुकाराम जगताप यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकृत उमेदवारीची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून केली आहे.
पिढ्यान् पिढ्या मिळालेल्या मजबूत राजकीय परंपरेच्या असणाऱ्या सौ. ज्योती जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी भक्कम असून त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्षे ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका निभावली आहे त्यांच्ये सासरे काशिनाथ रामा जगताप यांनी चोराखळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्य केले आहे. तसेच त्यांच्या जाऊबाई दैवशाला बापुराव जगताप यांनी सदस्या म्हणून काम करत गावात महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा दिली आहे.पुढे त्यांच्ये पती तुकाराम काशिनाथ जगताप यांनी उपसरपंच म्हणून काम करत स्थानिक विकासकामांना गती दिली आहे.या पार्श्वभूमीचा वारसा पुढे नेत ज्योती जगताप यांनीही गावातील विविध प्रश्न,महिला सबलीकरण, पाणीपुरवठा,रस्ते,स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेतला आहे. सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून जनसामान्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने आवाज उठवल्याने त्यांची लोकप्रियताआहे…
येरमाळा गटातील आगामी जि.प. निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उत्सुकता असून सौ. ज्योती जगताप यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक महिलांचा आणि परिसरातील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही बोलले जात आहे. आता पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावावर हिरवा कंदील मिळतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



