जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा येरमाळा येथे संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा — धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशन व श्री येडेश्वरी स्पोर्टस येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निवड चाचणी स्पर्धा ज्ञानद्योग विद्यालय येरमाळा येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली.
जिल्हाभरातून कुमार गटाच्या १५ तर कुमारी गटाच्या एकूण ६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे सहकार्याध्यक्ष महादेव साठे व धाराशिव जिल्हा कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. निवड पात्र ठरलेले खेळाडू पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करणार आहेत.पंच म्हणून मोहन पाटील, रोहन जगताप, दत्ता जावळे, रमेश माळी औदुंबर जगताप, संतोष चव्हान व सय्यद यांनी काम पाहिले.युवा खेळाडूंना जिल्हा पातळीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आगामी २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करणार असल्याचे आयोजक समिती सदस्य संतोष जमदाडे यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबचे प्रितेश बारकुल, गणेश पवार, आकाश बारकुल, अनिकेत पवार, सुजीत गुप्ता, रविकिरण आगरसे, सोहेल पठाण यांच्यासह क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



