येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाच्या राज्य पथकाकडून पाहणी

तेरणा काठ वृत्तसेवा — राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्यक्रमापैकी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम देशात व राज्यात सुरू असून यामध्ये सन 2024 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा येथे राष्ट्रीय स्तरावरील पथकाने भेट दिलेली होती त्यात गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत मूल्यांकनात पास होऊन संस्था प्रमाणित झालेली होती त्याचे कामकाज हे सुरळीतपणे सुरू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी राज्यस्तरावरून राज्य शासनामार्फत एका पथकाने 29 डिसेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रास तपासणीसाठी केली यामध्ये पथकातील डॉक्टर सुनंदा घोलप व डॉक्टर स्वप्नील गायकवाड यांनी रुग्णालयाचा दिवसभर आढावा घेऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आरोग्य आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी हे अथक परिश्रम घेत असून समूहाने काम करत असल्याचे निदर्शनास आले मूल्यांकनावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ जे एन सय्यद ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर बिराजदार दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतीक्षा काळे, जिल्ह्यावरून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक किशोर गवळी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे सर्व कर्मचारी आशा स्वयंसेविका उपस्थित होते.



