महिलांनी असा दिला इशारा :: दहिफळ ग्रामपंचायतीच नेमकं चुकलं काय ?

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुक्यातील दहिफळे गावात सात बीअर बार आहेत.दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.तरुन पिढी व्यसनात बरबाद होत आहेत.सात बिअर बार असताना नवीन बिअर बारला ग्रामपंचायतने परवाना दिला आहे.गावात लेडीज बार होणार असल्याची चर्चा आहे.तसेच लोककला सांस्कृतीक केंद्र होणार असल्याचे ऐकताच गावातील महिला भडकल्या अनं डायरेक्ट ग्रामपंचायत कार्यालयांवर मोर्चा काढला.
महिलांची गावातील ७० टक्के उपस्थीती असली तरच दारुबंदी करता येईल त्यासाठी महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन दारू बंदीचा ठराव घेण्याचे अश्वासन ग्रामसेवक सरपंच यांनी दिले असले तरी
संसार उघड्यावर आलाय,नवरा,मुलगा दारूत वाया चाललाय याची जाणीव महिलांना असल्याने गावातील महिला पाठीमागे न सरकता ग्रामसभा लवकर घेण्यात यावी यासाठी महिलांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. जवळपास दारूबंदीसाठी 350 महिलांची बैठक संपन्न झाली. ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन दारुबंदी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा ईशारा महिलांनी दिला आहे. असा महिलांनी सज्जड दम भरताच , चूक लक्षात येताच सरपंच व ग्रामसेवक यांनी येणाऱ्या १ जानेवारी वार गुरूवार रोजी सकाळी १०:३० वाजता. ग्रामपंचायत समोर दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महिलांच्या एकीचा विजय असून गावात जोपर्यंत दारुबंदी होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे महिलांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.. तसेच गावात दारूबंदी करण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा ही ईशारा दिला आहे.



