ताज्या घडामोडी
येरमाळ्यात बेवारस मृतदेह आढळला

तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा येथील सोलापूर संभाजीनगर हायवे पुलाच्या बाजूला सर्विस रोड लगत बेवारस अवस्थेत मयत मिळून आला आहे मयताच्या उजव्या हाताच्या पोटरीवर शंकर मंगला असे मराठीत गोंदलेले आहे तसेच त्याच्या बाजूला एस आर असे इंग्रजी अक्षरे गोंदलेले आहेत उजव्या हाताच्या पंजावर लव आकाराच्या चिन्हांमध्ये पुसट इंग्रजी अक्षरे गोंदले आहेत सदर इसमाने डाव्या हाताच्या पोटरीवर सलाईन घेतलेली पट्टी दिसत आहे सदर इसम कोणाच्या ओळखीचा किंवा नातेवाईक असल्यास संपर्क करावा येरमाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नंबर 55 / 2025 कलम 194 बी एन एस एस प्रमाणे पोलीस स्टेशन येरमाळा येथे दाखल आहे



