दहिफळ येथील खंडोबा यात्रेनिमित्त जुन्या सांस्कृतिक परंपरांना उजाळा

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त सोंगे नटविण्यात आले.सोंगाची परंपरा जुनी असुन पहिल्या काळी बैलगाडीतून सोंगे काढले जायची.गावातील शेकडो कलाकार सोंगात सहभागी व्हायचे.सोंगाची परंपरा जपण्यासाठी गावातील तरुण पिढी समोर येत आहे.यंदा तेरी बंजारन,पोतराज,गणपती,जोकर,हसवल,
मावळे,शिवाजी महाराज,शंकर ,राजा राणी सोंगे काढण्यात आली. कलाकार बालाजी भातलवंडे ,समाधान भातलवंडे,चाॅंद शेख,रोहित थोरवे,नारायण मते,गणेश मते,बापुराव भातलवंडे ,शेखर पाटील,चंद्रकांत जोगदंड,शौर्य घेवारे रूद्र गोरे, कुणाल आपुणे,रा.कोंबडवाडी नमन यादव कळंब ,सोहम यादव कळंब . विक्रांत, सोहम, प्रसाद, वेदांत प्रज्वल, युवराज यांच्यासह कलाकारांनी सहभाग घेतला.तसेच बाहेरचे अघोरी सोंगाचा सहभाग होता.सोंगे बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
सोंगाचा कार्यक्रम शांतेत पार पाडण्यासाठी,यात्रा कमिटीचे अध्यक्ष अभिनंदन मते,चरणेश्वर पाटील,समाधान मते,कृष्णा पाटील,प्रभाकर ढवळे,
फुलचंद पाटील,सुधीर मते,सज्जन मते,रामेश्वर भातलवंडे,योगराज पांचाळ अदींनी परिश्रम घेतले.



