तेरखेडा येथे पवनचक्की कंपनीच्या गाडीच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

तेरणा काठ वृत्तसेवा — वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे पवनचकीच्या गाडीने शेतकऱ्यास धडक दिल्याची घटना घडली आहे. कडकनाथवाडी येथील शेतकरी दशरथ झुंजकर (65) यांना पवनचक्की कंपनीच्या गाडीने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील स्मशानभूमीजवळ जोराची धडक दिली. या धडकेने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तात्काळ येरमाळा पोलीस स्टेशनला कळवली असता घटना घडल्यानंतर येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक तात्याराव भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच डीवायएसपी पवार हे देखील घटनास्थळी दाखल होते.
वाशी तालुक्यातील तेरखेडा, वाशी, कडकनाथवाडी, इंदापूर, बोरी या भागांत पवनचक्की प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशातच आता पवनचक्की कंपनीच्या गाडीने शेतकऱ्याचा जीव घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रात्री साडे नऊ पर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रकिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस उशिरा दाखल झाल्याने पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित शेतकऱ्याला पवनचक्की कंपनीच्या कंटेनर गाडीने धडक दिली. या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही बाब येरमाळा पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले


